आपल खान्देश

पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त!

रस्त्यांचा विकास हा नागरिकांच्या पथ्यावर...

पाचोरा लाईव्ह – सिटी रिपोर्टर

पाचोरा शहरातील पुनगाव रोड हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे या पुनगाव रोडाचे काँक्रेटीकरण हे कासव गतीने होत असल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहॆ. संपूर्ण रस्ता उकरून खडी टाकलेल्या रोडमुळे चालणेही मुस्किल झाले आहॆ अश्याने जनता मेटाकुटीस आले आहेत 

पुंनगाव रोड वरील ठाकरे नगर ते आदर्शनगर पर्यंत रोड उकरून खडीचा थर असल्याने ऐण उन्हाळ्यात येणे जाने जिकरीचे झाले आहे, दुचाकीने व पायी चालणारे व्यक्तीना ह्या रोडचा विकास नकोसा झाला आहॆ! सदर रोडचे सुरवाती पासून काँक्रेटीकरण हे कासव गतीने होत असल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांना झाला असून आता त्याची ऐण उन्हात त्याची झळ बसत आहॆ.

काम लवकर करायचे नव्हते तर रोड जेसीबिने उकरायला नव्हते पाहिजे. सदर काम रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रोड उकरून त्यावर खडी टाकली गेली आहॆ त्यावर रोज रोलर खडी दाबत आहॆ मात्र पाणीचा थेंब टाकत नाहीय हा कसला विकास होत आहे असा प्रश्न उपस्थित होतो.

रस्ते हे विकासाची नाडी असतात. शहरी व ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्‍यक आहे.

पाचोऱ्यातील नवीन काँक्रेटी रोडाचा दर्जा बाबत प्रश्न? त्यांची आजची दशा व उद्याची दुर्दशा पुढील अंकात

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे