पाचोऱ्यात प्रेमी युगुलानं एकाच दोरीवर गळफास घेत केली आत्महत्या; परिसरात एकच खळबळ
पाचोरा शहरातील वरखेडी परिसरामध्ये राहणाऱ्या एका प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे 2 वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र राठोड (वय 19) आणि साक्षी भोई (वय 18, दोघेही रा. वरखेडी नाका, पाचोरा) असे मयत तरुण- तरुणीचे नाव आहे. यातील तरुणी साक्षी भोई हिचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जून रोजी विवाह संपन्न झाला होता. विवाह नंतर ती रविवारी माहेरी आली होती. दोघेही ‘वरखेडी नाका येथे दोन घरे सोडून राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारीच्या मध्यरात्री, जेव्हा मुलीच्या भावाला जाग आली तेव्हा त्याने बहिणीला शोधले. मात्र ती मिळाली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले तर त्या ठिकाणी दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, पाचोरा शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरवले. या ठिकाणी त्यांनी स्वतःला एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दोघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय हलवण्यात आले, दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोई हिचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. जितेंद्र हा बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरामध्ये खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर आघात कोसळला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.


