आपल खान्देशराजकीय

भडगाव तालुक्यातील कजगाव, भोरटेक मधील असंख्य तरुणांनी शिवसेनेचा भगवा घेतला हाती…

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामांचा झंझावात, आपुलकीची वागणूक, हाकेला हजर होऊन अहोरात्र जनसेवा करत असणारे आमदार किशोर अप्पा पाटील त्यांच्या नेतृत्वाचे आकर्षण कायम असून त्यांच्या कामांनी प्रभावित होऊन भडगाव तालुक्यातील कजगाव, भोरटेक येथील असंख्य तरुणांनी दिनांक २३ जून २०२३ शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

त्यावेळी पक्षाचा भगवा रुमाल टाकून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कजगाव येथील सरपंच पुत्र अनिल रघुनाथ महाजन, माजी विधानसभा प्रमुख अविनाश कुडे, प्रविण ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भोरटेक येथील चेतन शितोळे, राहुल महाजन, आकाश पाटील, वरुज पाटील, शुभम महाजन, निलेश धनगर, प्रेम देशमुख, बंटी देशमुख, रवींद्र शितोळे, नंदू महाजन, अजय पाटील, अमोल पाटील, समाधान महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन तर कजगाव येथील सुरेश मोरे, कैलास वाघ, मच्छिंद्र मोरे, राजेंद्र सोनवणे, सुनील शिंदे, राकेश मोरे, तेजस साळुंखे समाधान अहिरे, स्वींट मोरे, किसन सोनवणे आदी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश जाधव यांनी मानले आगामी काळात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वातच आपण गाव विकासाची कामे करणार असल्याचा मनोदय तरुणांनी बोलून दाखविला

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे