महाराष्ट्र

सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही?

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच्, सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पुणे, वृत्तसेवा, दिनांक १५ जुलै -२०२१ महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लूडबूड करताना दिसतात. पण, यापुढे त्यांच्या कामात त्यांचे पती अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही. शिवाय,संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या निर्णयामुळे सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही. असे वृत्त १४ जुलै रोजी सरकार नामा या वेबसाईट ने उरुळी कांचन येथून प्रकाशित केली आहे. हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर,सदस्य सचिन धुमाळ यांनी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत सरकारने वरील आदेश दिला आहे. नव्या आदेशामुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य या पदाधिकाऱ्यांनी त्यांची कामे स्वतः करणे गरजेचे आहे. गावाचा कारभारी म्हणून सरपंचांचा लौकिक असतो. सरपंचांचा त्याच्या गावांत वेगळाच तोरा असतो. एक वेगळाच सन्मान असतो. मात्र, महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप कायम असतो. या संदर्भातच बडेकर,सचिन धुमाळ यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सरकारने वरील आदेश दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाईकांनी मुळीच बसता कामा नये,असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच्, सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये चौकशीनंतर विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे