आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यातील एन आर ठाकरे सरांना राज्य शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त 


पाचोरा लाईव्ह – सिटी रिपोर्टर

पाचोरा- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा 2021 चा जिल्हा क्रीडा पुरस्कार पाचोरा येथील श्री गो. से. हायस्कूल चे पर्यवेक्षक नरेंद्र रामदास पाटील यांना देण्यात आला आहे. प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी करून जिल्ह्याची मान वृद्धिंगत केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री नरेंद्र रामदास (ठाकरे) पाटील यांना बुद्धीबळ खेळ अंतर्गत गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. दि 1 मे रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रदीप तळवलकर व श्रीमती गुल्हाने मॅडम उपस्थित होत्या.

श्री नरेंद्र ठाकरे सर यांनी सपत्नीक उपस्थिती देऊन या पुरस्काराचा स्वीकार केला याप्रसंगी, सौ. ज्योती पाटील, चिरंजीव आर्चीक पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, धीरज विसपुते, आर.बी. तडवी, महेश कौण्डिन्य, आर. बी. बाँठिया, पी. एम. पाटील, आर. बी. बोरसे, अरुण कुमावत, सुबोध कांतायन, रणजीत पाटील व श्रीमती छाया सूर्यवंशी उपस्थित होते.

श्री नरेंद्र ठाकरे सर यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजयनाना वाघ, सचिव ॲड. महेश देशमुख, उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खालील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे प्रमुख वासुदेव महाजन, तसेच पाचोरा तालुका बुद्धिबळ संघाचे अध्यक्ष दुष्यंतभाई रावल, शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

एन आर ठाकरे सरांचा परिचय-

नरेंद्र पाटील उर्फ एन.आर. ठाकरे सर यांचे शिक्षण बी.एस.सी. एम पी एड.झाले असून ते श्री गो. से. हायस्कूल पाचोरा येथे क्रीडा विभाग प्रमुख आणि पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील तीस वर्षापासून बुद्धिबळ खेळाचे जिल्हा मार्गदर्शक म्हणून ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात “चेस इन स्कूल” हा उपक्रम सुरू करून 65 शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी बुद्धिबळ खेळाविषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या 14 17 व 19 वर्षाआतील शालेय क्रीडा संघाचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून ते सतत पंधरा वर्षांपासून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नाने जळगाव जिल्ह्याचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले असून त्यांच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व राष्ट्रीय विजेतेपद सुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या सर्वंकष योगदानाचा विचार करून राज्य शासनाने त्यांना 2021 चा जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे