रुपाली चाकणकर यांना खान्देश हित संग्राम महिला आघाडीच्या वतीने राज्यातील महिलांच्या समस्या बाबत निवेदन
झूम मराठी वृत्त
धुळे – महाराष्ट्र प्रदेश महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर या बुधवार 9 फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना खान्देश हित संग्राम महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महिलांना कोर्टात खावटी मंजूर केली जाते. परंतु, दर महिन्याला त्यांना खावटी मिळत नाही. तसेच, पोलिसांनी महिला विषयक कुठलीही तक्रार असल्यास जसे बलात्कार, शारीरिक हिंसा, घरेलू हिंसा त्याची चौकशी करून लवकरात लवकर तपास करून कोर्टात केस दाखल करावी, महिलांच्या बाबत कुठल्याही केसचा निकाल जलदगतीने मिळावा, घटस्फोटीत किंवा परितक्ता महिलांना कोर्टाने खावटी मंजूर केली असल्यास त्यांना खावटी दर महिन्याला मिळत नसल्यास कोर्टाने अशा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच खान्देशातील महिला-मुलींना रोजगारसाठी पुणे-मुंबई सारख्या शहरात जावे लागते. तरी त्यांना खान्देशातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन राज्य महिला आयुक्त रुपाली चाकणकर यांना खान्देश हित संग्राम महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी खान्देश हित संग्राम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता बैसाणे, प्राजक्ता देसले, मंगला मोरे, अॅड.भाग्यश्री अहिरे, सुषमा महाले, अंजली कौर, नयना सोनार, माधुरी पाटील आदी महिला कार्यकर्त्या निवेदन देताना उपस्थित होत्या.


