पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावात दिव्यांग महिला सरपंचपदी विराजमान…
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया @दिलीप जय परदेशी
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील आखतवाडे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंचपदी श्रीमती कल्पना गढरी निवड करण्यात आली आहे.
आखतवाडे गावात सन २०२०/२१ हया निवडणुकीत वार्ड क्रमांक ३ मधून निवडून आलेल्या श्रीमती कल्पना पंडितराव गढरी यांची काल ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी यांच्या समक्ष बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. मुळात म्हणजे श्रीमती कल्पना गढरी हया दिव्यांग आहेत. आखतवाडे गावाच्या इतिहासात हया पहिल्या दिव्यांग महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. त्यांचे पाचोरा तालुक्यात सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच कल्पना गढरी यांचे १० वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे आई वडील या जगात नसुन त्या एकट्याच आखतवाडे गावातील वडिलोपार्जित शेती करतात. कल्पना ताईंचे संपूर्ण ग्रामस्थांसह माहिती अधिकार कार्यकर्ते मुरलीधर परदेशी यांनी देखील सरपंच कल्पना गढरी यांचे विशेष अभिनंदन केलं आहे. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा राजकारणातही उमटवला आहे. एखादी महिला संधी मिळाल्यास तिचं सोनं करू शकते, आखतवाड्याच्या महिला सरपंचानीं गावला प्रगती पथावर नेऊन ग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या पाणीपुरवठा स्वच्छता समिती, कृषी विकास समिती, जैवविविधता समिती, तंटामुक्ती समिती, रेशन संदर्भातील दक्षता समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन समिती यांच्या कामकाजावर चर्चा करून नियंत्रण ठेवावे लागणार आहॆ. आणि ते यशस्वी होतील अशी आशा आहॆ.


