आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंगसखी

शिक्षकी पेशाला काळिमा..तब्बल 16 साक्षीदार अन अखेर निर्णय झाला..

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे एक प्रकरण जळगाव जिल्ह्यात समोर आलेले होते. शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी खाजगी क्लासचा शिक्षक असलेला एक व्यक्ती यास जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सोबतच सव्वालाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 11 मे रोजी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एन माने यांनी हा निर्णय दिलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तुषार शांताराम माळी ( वय 33 वर्ष नशिराबाद ) असे आरोपीचे नाव असून तो नशिराबाद परिसरात श्री समर्थ नावाने क्लासेस चालवत होता. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या घरच्यांना भेटून त्याने ती हुशार आहे तिला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा. मी तुमच्याकडून तिचे पैसे घेणार नाही असे देखील तो म्हणालेला होता. ऑगस्ट 2017 पासून ही विद्यार्थिनी त्याच्याकडे क्लासला जायला लागली त्यावेळी त्याने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. डिसेंबर 2017 पासून फेब्रुवारी 2018 पर्यंत आरोपी तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य करत होता.

अल्पवयीन मुलीने विरोध केल्यानंतर त्याने तिला जर कोणाला सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना मी ठार मारेल. माझ्याकडे मोबाईलमध्ये तुझे काही काढलेले फोटो आहेत ते मी परिसरातील लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल अशी देखील धमकी तो सातत्याने देत होता त्यामुळे पीडित मुलगी ही घाबरून गेलेली होती आणि तिने कुणाला काही सांगितले नाही.

मार्च 2018 मध्ये तिच्या पोटात दुखू लागले म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ती गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला. मुलीच्या आईने तिला खोदून खोदून आरोपीचे नाव विचारले त्यावेळी तिने आरोपीचे नाव सांगितले आणि 17 मार्च 2018 ला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात तब्बल 16 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी , तपासी अधिकारी यांच्या साक्षीदेखील महत्वपूर्ण ठरल्या. पीडित विद्यार्थिनीला दंडाच्या संपूर्ण रकमेतून 50% रक्कम देण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिलेले असून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे