आपल खान्देश

“तू इतरांची काळजी घेतोय, मात्र स्वतःचीही काळजी घे”, शरद पवारांचा निलेश लंकेना फोन

मुंबई । कोरोना काळात करत असलेल्या कामामुळे राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची राज्यभर सर्वत्र चर्चा आहे.

आता तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर निलेश लंकेना फोन करून कौतुकाची थाप देत “स्वतःची देखील काळजी घेण्याचा” सल्लाही दिला आहे. राज्यातील कोरोनासारख्या आव्हानात्मक स्थितीत आपले कर्तव्य जाणून अनेक लोकप्रतिनिधी अत्यंत चांगला आदर्श ठेवत आहेत. त्यापैकीच एक आहेत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आहेत. शरद पवार यांनी स्वतः आता ही कौतुकाची थाप दिली आहे.

शरद पवार निलेश लंके यांना फोन करून म्हणाले की, “तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळालं, तू इतरांची काळजी घेतोय मात्र स्वतःची पण काळजी घे. तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास कळव”, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे. निलेश लंके यांच्या कामाची दखल घेत थेट हॉस्पिटलमधून शरद पवार यांनी लंके यांना हा फोन लावल्याची माहिती मिळते.

निलेश लंके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले होते. तर दुसऱ्या लाटेतही त्यांनी आणखी एक कोविड सेंटर उभारले. या काळात निलेश लंके स्वतः ऑन फिल्ड असून सर स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत.”माझं काय व्हायचं ते होऊ द्या मात्र जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत”, असा निर्धारच निलेश लंके यांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे