आपल खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंती पाचोरा येथे उत्साहात संपन्न

संताजी जगनाडे महाराज जयंती पाचोरा येथे उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) तेली समाजाचे संत संताजी महाराज यांची जयंती निमित्त बाहेरपुरा येथील तेली समाज कार्यालयासमोरील तेली चौक परिसरात प्रतिमापूजन आणि संताजी महाराज पाळणा गाऊन साजरा झाला.प्रथम बृहन्महाराष्ट्र तेली समाज पाचोरा शहर,तालुका कार्यकारिणी आणि तेली समाज पंचमण्डल, पाचोरा या दोन्ही सदस्यांनी जय संताजी असा जयघोष करून नव्या,जुन्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले,तसेच यापुढेही दोन्ही संघटना तेली समाज विकास होण्यासाठी एकदिलाने काम करतील,एकमेकांच्या उपक्रमांना सहकार्य करतील असा विश्वास या जयंतीदिनी एकमताने घेण्यात आला सकाळी ठीक 8 वाजेला सर्व समाज तेली चौकात संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष संजय चौधरी यांच्या हस्ते आणि माल्यार्पण BMTS शहर अध्यक्षा गायत्री चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सामूहिक पाळणा गायन होऊन संताजी जयंतीच्या सर्व समाजबांधव यांना शुभेच्छा देऊन ,नवनियुक्त पदाधिकारी यांचा गौरव,अभिनंदन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी तेली पंचमण्डल अध्यक्ष संजय चौधरी,सचिव नारायण चौधरी, BMTS शहर उपाध्यक्ष तुषार चौधरी, तालुका कार्याध्यक्ष पी टी चौधरी, माजी अध्यक्ष शिवाजी चौधरी, प्रकाशजीभु चौधरी, समाजसेवक वीरेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे