पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून, शिवविवाह चर्चेचा विषय बनला
पाचोरा येथील सौ.प्रतिभा व श्री. मंगेश हरी पाटील यांची कन्या चि.सौ.का. वैष्णवी (इंटरियर डिझायनर) व चिरंजीव मंगेश महेंद्र पाटील (सॉफ्टवेअर इंजिनिअर) यांचा दिनांक २ मे २०२३रोजी शिवविवाह स्वप्नशिल्प हॉटेल व बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला या विवाहची तालुक्यात चर्चा आहे.
जिजाऊ वंदना हात जोडून म्हटले आणि आपण समविभागी सम्राट बळीराजाचे मुलं आहोत व त्यामुळे जो शेतकरी वर्षभर शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्या अन्नाची नासाडी न करता कुठल्याही प्रकारच्या अक्षदा न टाकता फक्त फुल फेकून व टाळ्या वाजून वधू वरास आशीर्वाद देण्यात आले
या विवाह सोहळ्याचे संपूर्ण पाचोरा तालुका व परिसरामध्ये कौतुक होत आहे. विवाहाची सुरुवात प्रथम जगतगुरु संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे पूजन करून करण्यात आले. वधू-वरांचा,दोघांचे आई वडील,मामा यांचा परिचय,दोघांचे कुळ, मामकुळ,मुळगाव मामांचे गाव असा परिचय करून देण्यात आला,नंतर विचारपीठावर वधू वर यांच्या आई वडिलांना व दोघांच्या मामांना उभे करण्यात आले. त्यानंतर व्याही आणि विहिन भेट एकमेकांना पुस्तक देऊन संपन्न झाले. सर्वांनी जिजाऊ वंदना हात जोडून म्हटले आणि आपण समविभागी सम्राट बळीराजाचे मुलं आहोत व त्यामुळे जो शेतकरी वर्षभर शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्या अन्नाची नासाडी न करता कुठल्याही प्रकारच्या अक्षदा न टाकता फक्त फुल फेकून व टाळ्या वाजून वधू वरास आशीर्वाद देण्यात आले. या विवाहात अतिप्राचीन सिंधू संस्कृती,जी मातृसत्ताक महिलांचे सन्मान करणारी होती त्याची पाऊलखुणा दिसून आले.
वधू उजव्या बाजूस आणि वर डाव्या बाजूस उभे होते. याच बरोबर महिलांचा आधी सन्मान व्हावा म्हणून वराने आधी वधूच्या गळ्यात हार घातला नंतर वधूने वराला हार घातला या मागील विचार असा की,मुलगी आपले घर, परिवार,नातेवाईक, सर्वस्व सोडून मुलाच्या घरी जात असते,म्हणून पाहुण्यांचा जसा सन्मान घरमालक स्वागतोत्सुक असतात त्याच प्रमाणे मुलाने मुलीचे आपल्या घरात, परिवारात,आयुष्यात स्वागत केले. उपस्थित सर्वांना जिवंत देव समजून साक्ष ठेवून, वधू व वराने आदर्श वैवाहिक जीवनाची प्रतिज्ञा घेतली. या विवाहाचे पुरोहित्य महाराष्ट्रभरात लौकिक असलेले शिवसेवक राजेंद्र पाटील गाळणकर यांनी केले. या विवाह सोहळ्यास विद्यमान आमदार किशोर अप्पा पाटील,भाजप नेते अमोल शिंदे,शिवसेना नेत्या सौ.वैशालिताई सूर्यवंशी,पा. ता.शि. संस्थेचे चेअरमन संजय वाघ,भाऊसाहेब डी. एम.पाटील, ग.स.संचालक राम पवार व भाईदास पाटील,माध्यमिक पतपेढी संचालक भगतसिंग पाटील,एरंडोल व धरणगाव पतपेढी चेअरमन प्रमोद पाटील चिलानेकर,नवलभाऊ प्रतिष्टान,ग्रामविकास मंडळ,रुख्मिणीताई प्रतिष्ठान,संजय एज्युकेशन सोसायटीचे सर्व प्रशासकीय अधिकारी,मुख्यध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ज्येष्ट नाट्यकर्मी शंभू पाटील,काँग्रेसचे सचिन सोमवंशी व पाचोरा परिसरातील सर्वच राजकीय नेते,ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन,सी एन चौधरी,शांताराम चौधरी,लक्ष्मण सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, विनायक दिवटे,अनिल येवले,नंदकुमार शेळकर, प्रशांत येवले,प्रमोद पाटील,शिवाजी शिंदे आणि सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिव विवाहाची नियोजन इंजि. सुमित पाटील तर संकल्पना इंजि.तेजस मंगेश पाटील यांची होती.



