Nashik अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोहबदल्यात पोलिसाने मागितली लाच; सापडला ‘एसीबी’च्या जाळ्यात
नाशकात अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नाशिक उपनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दिनांक 3 मे 2023 रोजी बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार जवळ लाचलुचपत प्रतिबंध विभागांच्या पथकाने रंगेहाथ हात पकडून अटक केली.
सागर डगळे असे लाचखोर सहाय्यक पोलीस निषकाचे नाव आहे. सागर डगळे याची 2022 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती. काही महिन्यापूर्वी झालेल्या विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्यांचा समावेश होता. प्रति मिरचीचे आदेश नसल्याने सागर डगळे सध्या नाशिक येथील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांचा भवाने प्रेम प्रकरणातील नाशिक शहरातील उपनगर हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या भावास अटक झाली होती. त्यानंतर सध्या तो जामीनावर सुटलेला आहे तर लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक सागर डगळे हा या गुन्ह्याचा तपास करीत आहे. सदरील गुन्ह्याचे चार्जशीट दाखल करताना त्यात मदत करण्याच्या मोबदल्यात राजकोट सागर डगळे यांने तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली होती. त्यात तडजोड होऊन दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.सागर डगळे याने यापूर्वीही तक्रारदाराकडून तीन वेळा ऑनलाइन पैसे घेतले होते. दरम्यान तक्रारदाराने यासंदर्भात दिनांक 2 मे रोजी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार लाचखोर सागर डगळे यास बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी लाचेची सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रंगेहात पकडून अटक केली आहे.



