शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची केलेली घोषणा अनपेक्षित – आ. सुहास कांदे
नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याची घोषणा अनपेक्षित असून यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असला तरी खासदार शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय मागे घ्यायला हवा असे मत शिवसेना नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबई येथे त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकीय निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्याने या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. याबाबत विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी खासदार शरद पवार हे सर्वच क्षेत्रातील गढा अभ्यासू असलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांची महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे. असे मत व्यक्त केले आहे दरम्यान खासदार शरद पवार यांच्या घोषणेनंतर मनमाड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.


