भडगाव तालुक्यात कृषी अधिकारीनी शेतकऱ्यांसाठी शेतात भरवले शेतशाळा वर्ग
झूम मराठी शेत शिवार
भडगाव तालुक्यात पिंपरखेड गावातील शेतीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग अंतर्गत शुक्रवारी शेतशाळा वर्ग भरविण्यात आले. पिकांना फवारणी करतांना घ्यायची काळजी तसेच हरभरा पिकाची लागवड ते काढणी पोखरा प्रकल्पाची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग अंतर्गत भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावातील शेतकऱ्यांसाठी पाचोरा उपविभागीय कृषि अधिकारी एन वी नाईनवाड व तालुका कृषी अधिकारी भडगाव बी बी गोर्डे कृषी सहाय्यक, एस बी गिरी व शेतीशाळा समन्वयक प्रदिप बडगुजर यांच्या उपस्थितीत, राजेंद्र हेमराज पाटील यांच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा या पिकावर हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा वर्ग पाठ घेण्यात आली. त्या वेळेस समुह सहाय्यक श्रीकांत राजपूत शेतीशाळा प्रशिक्षक रोहित वाघ यांनी दिली.
निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क फवारणी करतांना घ्यायची काळजी तसेच हरभरा पिकाची लागवड ते काढणी पोखरा प्रकल्पाची माहिती दिली, सापळ्यांचा व पक्षी थांबे वापर या संदर्भात माहिती देण्यात आली.


यावेळी गावातील शेतकरी बांधव व महिला यांना शेतीशाळा प्रशिक्षण किट व टोपी मंडळ अधिकारी एस टी पाटील, मंडळ अधिकारी यु आर जाधव, कृषी सहाय्यक गिरी, कृषी सहाय्यक एस डी पाटील, कृषी मित्र श्री रवींद्र पाटील आणि कृषी ताई सरला पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले उपस्थिती होती. आत्मा प्रकल्पाचे अमोल सोनवणे यांनी ( पी एम एफ एम ई) प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग अन्नयन योजना प्रशिक्षण कार्यशाळा पोखरा योजनेच्या प्रकल्पाची माहिती दिली व इतर काही पिकांची पण माहिती दिली.



