Nandagoan | नांदगाव तालुक्यातील जातेगाव श्री पिनाकेश्वर महादेवाच्या सभामंडपाचे रामदास स्वामी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेच्या डोंगरावरी श्री पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरील सभा मंडपाचे दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता लोकार्पण सोहळा ह.भ.प.रामदास स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणेश गिरी महाराज हे होते. या सभा मंडपाचे बांधकाम हे पूर्ण जीर्ण झाल्याने देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आणि सचिव रामदास पाटील, कल्याण पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवभक्तांना नवीन बांधकाम करण्यासाठी लोक वर्गणीचे आव्हान केले होते. त्यास प्रतिसाद देत सदाशिव होळकर, मगन परदेशी, आप्पा पवार, संदीप वाकचौरे, अनिल जाधव संभाजीनगर, रामदास खिडकर नाशिक, राजेंद्र भालेराव, कृष्णाजी वाघ धोंदलगाव, ज्ञानेश्वर पगारे, निवृत्ती चव्हाण संभाजीनगर, शांताराम, रवींद्र चव्हाण, बिपिन चव्हाण, रमेश गायकवाड कोटमगाव, रामदास चव्हाण, श्रावण भागवत, कल्याण पाटील चव्हाण, शिवाजी वाघ पिंपरी हवेली, सुंदरलाल चव्हाण, डॉक्टर प्रदीप चौधरी,भरत चव्हाण, संजय बंड, सौ संजीवनी लामतुरे बार्शी जिल्हा सोलापूर, पोपट खैरनार, सुनील हिंगमिरे, रमेश गायकवाड, सुभाष पवार, मच्छिंद्र बागुल, प्रभू सिंह परदेशी, सुनील मगर (छत्रपती संभाजीनगर), गणेश व्यवहारे, राजेंद्र पवार, रशीद शहा, नंदू सिंह परदेशी, महादू काळे यांनी लोक वर्गणी दिली होती. त्यातून या सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्या दानशूर व्यक्तींचे व आर्किटेक तांबट. बांधकाम व्यावसायिक राजेंद्र नरवडे तसेच लोक आपण सोहळ्यासाठी मंडपाचे सौजन्य दिलेल्या धोंडीराम पवार आणि सहकार्याचे रामदास स्वामी महाराज यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

या सभा मंडपाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने याप्रसंगी रामदास स्वामी यांनी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा देत सन 1960 च्या दशकात जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांनी पुरातन जिर्णोद्धार करून हेमाडपंथी पद्धतीचे मंदिराचे बांधकाम करून जिर्णोद्धार केला होता. व त्यानंतर संत जनार्दन स्वामी हे वेरूळ येथे गेल्यानंतर बालब्रह्मचारी सद्गुरु रामानंद महाराज यांनी पन्नास वर्षांपूर्वी पूर्ण सभा मंडप बांधकाम पूर्ण केले होते. यावेळी येथे येण्यासाठी रस्ता नव्हता. बांधकामाचे अशा परिस्थितीत संत जनार्दन स्वामी आणि गंगा नंद महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने मंदिराचे व सभा मंडपाचे तसेच भक्त निवारा, भंडारगृह, गोशाला इत्यादी बांधकाम पूर्ण केले होते. त्यावेळी देखील मी ब्रह्मचारी सद्गुरू गंगा नंद महाराज यांच्या सोबत होतो. व आज त्या जीर्ण झालेल्या सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते करताना मला मनापासून आनंद होतो आहे. असेच जातेगाव आणि नागरिकांनी एकत्र येऊन येथे येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावी यासाठी तसेच इतर अनेक कामे करण्यासारखे आहे ते करावे असे बोलताना म्हणाले.
यावेळी साध्वी मनीषाताई, डॉक्टर शरद आहेर, वाल्मीक जठार, रवींद्र चव्हाण यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाची वितरण करून करण्यात आले.


