ब्रेकिंग
Pachora Crime | पाचोरा शहरातील भाजी मंडी परिसरातील सट्टा पेढीवर छापा..!
पाचोरा शहरातील भाजी मंडी परिसरातील सट्टा पेठीवर चाळीसगाव उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकासह छापा टाकून रोख रक्कम 83,690/- रुपये व सट्टा जुगाराचे साधने असे एकूण 1,15,690/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तेथे उपस्थित आरोपी सट्टा खेळताना व सट्टा चालवणाऱ्यावर मुंबई जुगार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.


