गुन्हेगारी

अनैतिक संबंधातून मुलगी जन्माला आली, आईने लपवण्यासाठी केले ‘ असे की ‘ ?

‘वृत्तसंस्था पुणे’

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. तीन महिन्याच्या मुलीचे घरातून कुणीतरी अपहरण केले, अशी तक्रार घेऊन ही महिला पोलिस ठाण्यात पोहोचली होती मात्र तपासादरम्यान या आईने तिचा गळा दाबून खून केला आणि 13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरून बंडगार्डन पुलावरून नदीत फेकून दिला, असे धक्कादायक सत्य या तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या मुलीबाबत नातेवाईकांना आता काय सांगायचे ? या भीतीपोटी तिने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

सदर महिला ही मूळची अहमदनगरची असून मागील काही महिन्यांपासून ती आपल्या भावाकडे चित्रा चौकात राहायला आहे. सदर महिला ही घटस्फोटित असून तीन महिन्यापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. ‘ शुक्रवारी संध्याकाळी मी घरात झोपले असताना कुणीतरी माझ्या तीन महिन्याच्या मुलीला पळवून नेले ‘, अशी तक्रार तिने येरवडा पोलिस ठाण्यात दिली होती .

पोलिसांनी सुरुवातीला तिच्या म्हणण्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता मात्र चौकशी दरम्यान तिच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती आढळून आली आणि पोलिसांचा संशय वाढला. अनैतिक संबंधातून या मुलीचा जन्म झाला होता आणि ती रडत रात्रभर जागवायची म्हणून आपणच तिचे तोंड दाबून तिला ठार मारले आणि तेरा वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत बांधून बंडगार्डन पुलावरून फेकून दिला, अशी धक्कादायक कबुली तिने दिली आहे. येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून तिच्या तेरा वर्षाच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे