आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे, आता नुकसानीच्या पंचनामेची प्रतीक्षा..


नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- सुरू झालेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला‌. गेल्या सात ते आठ दिवसापासून नांदगाव येथील नव्या प्रशासकीय मध्यवर्ती संकुलाच्या आवारात नांदगाव तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना आंदोलनामध्ये उतरल्या होत्या. दिनांक 21 मार्च 2023 रोजी गुरुवारपासून पुन्हा एकदा आपल्या विभागामध्ये कर्मचारी कामावर रुजू झाले. दरम्यान नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामांचे कळंबलेल्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता असून आठवडाभरामध्ये दप्तर दिरंगाई दूर करण्यासोबतच कामकाज सुरू करण्याला प्राधान्य दिले जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी दिली.

शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या मागणीसाठी संप पुकारला होत. पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन मिळाल्याने संपर्करांच्या राज्य समन्वय समितीने कामावर पुन्हा परतण्याचे आवाहन केलें असल्यामुळे नांदगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग आधी विविध आस्थापने वरील कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत. या संपात तालुक्याच्या ८४८ कर्मचाऱ्यांपैकी 729 कर्मचारी सहभागी झाले होते. हे आंदोलन करते नांदगाव येथील नवीन तहसील कार्यालयातील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलात उभारण्यात आलेल्या शामियानात घोषणाबाजी करीत ही आंदोलनाला बसली होते. महसूल, कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक भरती, शिक्षक सेना, जागृत शिक्षक संघटना, पदवीधर प्राथमिक जुनी पेन्शन कृती समिती, माध्यमिक शिक्षक संघटना, पीडीएफ मुख्याध्यापक संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लेखन कर्मचारी संघटना, अपंग कर्मचारी संघटना आणि संघटना यात उतरल्या होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे