आपल खान्देश

जळगाव साफसफाई कामगार पाल्याना तात्काळ शिष्यव्रुत्ती देण्यात यावी,राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी

झूम मराठी वृत्तसेवा

जळगाव (प्रतिनिधी)राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा जळगांव चे वतीने साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणार्या पालकांचे मुलांना तात्काळ शिष्यव्रुत्ती मिळणेबाबत मा.जिल्हाअधिकारी तथा उप जिल्हाअधिकारी साहेब, जळगांव शहराचे महापौर मा.सौ.जयश्रीताई महाजन,जळगांव व संबधित अधिकारींना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा जळगांव चे वतीने मा.जिल्हाअधिकारी तथा उप जिल्हाअधिकारी साहेब, जळगांव शहराचे महापौर मा.सौ.जयश्रीताई महाजन,जळगांव जिल्हा कोषागार अधिकारी साहेब,जळगांव जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेब ,मा.आयुक्त साहेब जळगांव शहर महानगरपालिका जळगांव तथा विषेश कार्यकारी अधिकारी साहेब यांना जळगांव शहरातील साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणार्या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यव्रुत्ती योजनेचा केंन्द्र व महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग यांचे दिनांक १ मार्च २०२१ चे शासन परिपत्रकाची तात्काळ अमलबजाणी करुन साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणार्या पालकांचे मुलांना तात्काळ शिष्यव्रुत्ती मिळणेबाबत संबधित अधिकारींना निवेदन देण्यात आले. ह्या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे मा.महानगर जळगांव जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अभिषेकजी पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे, उपाध्यक्ष प्रविण माळी,सरचिटणीस चंद्रमणी सोनवणे, नंदकिशोर कंडारे,राष्ट्रवादी काँग्रेस फाऊंडर मेंबर फिरोज भाई शेख, गौरव लंवगले,राकेश माळी,लखन सांगीले, यश चांगरे, आकाश घेघंट,हुसेन बाबा साबरी ,इम्रान सैय्यद पटवे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्तेंनी निवेदन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे