आपल खान्देशगुन्हेगारी

आखतवाड्यात दोन गटात हाणामारी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल!

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील आखातवाडे गावात काल दिनांक 16 /06/2022 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जागेवरून दगड उचलून नेल्या बाबत जागे मालकास सांगण्याच्या संशयावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यात एकमेकांविरिधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे जागेवरून दगड उचलून नेल्या बाबत जागे मालकास सांगण्याच्या संशयावरून फिर्यादीस शिवीगाळ करत, चापट बुक्यांनी मारहाण केली व फिर्यादीचा मुलगा याच्या हातावर पाठीवर काठीने मारून दुखापत करून जातीवाचक शिवीगाळ केली व फिर्यादीसं मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी अलकाबाई धिवरे यांनी फिर्याद पाचोरा पोलीस ठाण्यात नोंदवली, भादंवी 354(ब) 324,323,504,506,34 अ. जा.ज.अत्या प्रतिबिंब अधिनियम कलम 3(1) (R), (S), (W), ( i) ( ii ),3(2) 5A प्रमाणे नोंद झाली गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे