ब्रेकिंग

अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा – छगन भुजबळ


नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अवैध तसेच बनावट दारू विक्रीमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. हा प्रकार बिहार सह इतर राज्यात होतो असे नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील अवैध तसेच बनावट दारू विक्रीचे प्रकार घडतात हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आज दिनांक 20 मार्च 2023 रोजी सोमवारी सभागृहात केली. त्यावर उत्तरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

खारघर व नवी मुंबई येथील अभय दारू वाहतुकीबाबत महाराष्ट्र राज्याचे माझी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने खारघर आणि नवी मुंबई येथे बेकायदा वाहतूक केली जाणारी साधारणतः 76 लाखाची दारू जप्त केली आहे. गुजरात मध्ये नेऊन नामांकित कंपन्यांच्या बाटल्यामध्ये भरून विक्री करण्यात येत आहे. हे प्रकार मुंबई सह राज्यात होत असून बनावट व अवैध दारूमुळे अनेकांना आपला जीव गमावला आहे. ही बाब गंभीर असून मुख्य आरोपीला शोधून हे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. 

यावेळी उत्तरात मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, सदर प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 खाली गुन्हा रजिस्टर क्रमांक 252 /2022 नोंदविण्यात आला असून याप्रकरणी जप्त केलेल्या मुद्देमालाची वाहनासह एकूण किंमत अंदाजे रुपये 76.77 लाख इतकी आहे. सदर प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर पुण्याचा तपास सुरू आहे. कठोरात कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे