आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे आरोग्य सुविधा व सेतू सुविधा घरपोच कॅम्प संपन्न..

नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत विविध सेवा पुरविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आरोग्य सुविधा व सेतू सुविधा चा काल कॅम्प घेण्यात आला होता. यामध्ये दोन दवाखाना, दोन शासकीय सुविधा कार्यालय, डॉक्टर, सिस्टर, डोळ्यांचे डॉक्टर, सेतु प्रतिनिधी,आशाताई वर्कर, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते असा ताफा नागरिकांच्या सेवेत कार्यरत होता. 

  दिनांक 15 मार्च 2023 रोजी बुधवारी सकाळी 10 वाजता उपस्थितांच्या हस्ते श्रिफळ फोडुन कॅम्पची सुरुवात करण्यात आली.जी.आर.पाटील सर यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व सुविधा बाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. सर्व टीमचे त्यांनी स्वागत केले तर आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले. मांडवड, लक्ष्मी नगर, आजाद नगर, तसेच मांडवड गावातील नागरिकांनी या सर्वांचा लाभ घेतला.जवळ जवळ 530 नागरिकांनी लाभ घेतला असून डोळ्यांची तपासणी केली.

यामध्ये 306 नागरिकांना मोफत चष्म्ये देण्यात आले. यात मोठ्या संख्येने वयोवृद्ध व महिलांनी सहभाग घेतला होता.यावेळी 66 जणांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असुन लवकरच त्यांचे मोफत आॉपरेशन केले जाणार आहे.या शिवाय 264 जणांनी सेतू सुविधांसाठी संपर्क केला. यामध्ये रेशनकार्ड संबंधित अडचणी तर निराधार योजना, पेन्शन योजनेसाठी अनेकांनी कागदपत्रे जमा केली.   मोफत आरोग्य सेवा, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, डोळ्यांची तपासणी, ड्रॉप, चष्मा, सेतू सुविधांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले. तर मांडवड येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सदरचा उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. डॉक्टर संकेत मार्कंड, डॉक्टर कीर्ती आहेर, डॉक्टर आशा जगताप, डॉक्टर राहुल पाटील यांनी पूर्ण तपासणी केली. याप्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, सरपंच अंकुश डोळे, उपसरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, योगेश आहे, डॉक्टर प्रवीण निकम, सागर आहेर, सुधीर देशमुख, पी आर पाटील सर, भावराव बागुल, सुनील जाधव, अण्णा मुंढे, लक्ष्मी नगर ग्रामपंचायतचे सरपंच शंकर उगले, अंकुश उगले, रमेश घाडगे, कैलास आहेर, त्रिंबक आहे, सुदाम आहेर, वाल्मिक थेटे वाल्मिक काकळीज, सर्जेराव थेटे,गोरख थेटे, मच्छिंद्र निकम, रंगनाथ पिंगळे, साहेबराव गरुड, बापू हांडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कॅम्पसाठी प्रकाश शिंदे, निशांत बोडके, महिंद्रा आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार, भरत पारख, ओंमकार चिकणे यांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे