आपल खान्देश

पाचोऱ्यातील पुनगांवात माकडाची बॅन्ड लाऊन काढली अंत यात्रा..

माकडाच्या दशक्रिया विधीत १२० लोकांनी केले मुंडन..

 पाचोरा  (वार्ताहर चिंतामण पाटील) पाचोरा शहरा जवळील गिरणानदीच्या किनाऱ्यावरील पुनगांवात एका आजारी माकडावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवत माकडाला गंभीर जखमी केले होते, त्यात त्या माकडाचा मृत्यू झाला. पूर्ण गावाने एकत्र येत मयत माकडाचे बँड लावून अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर दशक्रिया विधीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत भोजन दिले व 120 गावकऱ्यांनी मुंडण करून सुतक पाळले.

पाचोरा शहरातील पुनगांव येथे दि. ९ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका आजारी माकडावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवत माकडाला गंभीर जखमी केले होते. गावातील तरुणांनी त्या माकडाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच माकडाची प्राणज्योत मालवली असता तेथूनच माघारी माकडाला गावात आणुन त्याची अंघोळ घालून नवीन कपडे घातले. फुलहार घालून तसेच बॅंन्ड लावून अंत यात्रा काढून विधीवत अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी गावातील पोलीस पाटील प्रविण ठाकुर,  चिंतामण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक आमले, दादाभाऊ सोनवणे, रविंद्र गुजर, सिताराम कोळी, अशोक परदेशी, आबा कोळी, अशिष चव्हाण, रमेश ठाकरे, हंसराज गुजर व गावकरी उपस्थित होते. या वेळी अनेक भाविक महिला व पुरुष यांनी माकडाला टोपी रुमाल देऊन नमस्कार केला काहिंना या वेळी आपले अश्रू अनावर झाले होते.

यानंतर उपस्थित गावकऱ्यांनी ज्या ठिकाणी माकडाला दफन केले त्याठिकाणी ओटा बांधकाम करुन वानर देवाची स्थापना करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दाखवली. या मृत माकडाप्रती गावकऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

माकडाच्या दशक्रिया विधीत १२० लोकांनी केले मुंडन…

पुनगांव येथील मृत माकडाचे दशक्रिया उत्तर कार्य पाच दिवसात करण्यात आले या वेळी गावातील जवळपास १२० लोकांनी दशक्रिया विधीत मुंडन (बाल दिले) केले व संपूर्ण गावातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानिमित्ताने गावकऱ्यांना उत्तर कार्य निमित्ताने भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे