भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायत उपसरपंच पदी आशाताई पाटील यांची बिनविरोध निवड
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
गिरड (कैलास सोनावणे) भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनी पाटील यांनी राजीनामा झाल्यानंतर रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत आशाताई अमृतराव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असता त्यांची गिरड ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत ग्राम विस्तार अधिकारी संजय भाऊराव पाटील यांनी कामकाज पाहिले या निवडणुकी प्रसंगी सरपंच प्रदीप सोनवणे ग्रामपंचायत सदस्य श्रीमती कोकिळाबाई पाटील, श्रीमती अश्विनी पाटील, श्रीमती प्रतिभा पाटील,श्रीमती गीण्याबाई पाटील, श्रीमती शोभाबाई कोळी, निळकंठ खैरनार, प्रवीण मनोरे, योगेश पाटील , दीपक पाटील, कैलास सोनवणे, रावसाहेब पाटील सह सर्व सदस्य उपस्थित होते निवड घोषित झाल्यानंतर त्यांचा सत्कार प्रसंगी माजी जि. प. सदस्य दिनकरराव पाटील ,गिरड ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवाजीराव अण्णा पाटील, माजी सभापती पंचायत समिती भडगाव आण्णासो मोहन अर्जुन पाटील ,माजी सरपंच भास्करराव पाटील,ज्येष्ठ नागरिक त्र्यंबक पाटील, आनंदा पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील, अमृत पाटील, महेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामपंचायत कर्मचारीयांनी निवडणूक यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रवीण मनोरे सर यांनी केले. दरम्यान वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडणार असून ग्राम विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच आशाताई अमृतराव पाटील यांनी झूम मराठीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.




