आपल खान्देशमहाराष्ट्र

संविधान आर्मी संघटनेच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मुक्ताराम बागुल यांची निवड..


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नांदगाव – (प्रतिनिधी) नांदगाव तालुक्यातील मुक्ताराम बागुल यांची संविधान आर्मीच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष संविधान बचाव चळवळीचे प्रणते व संविधान वादी नेते जगन भाई सोनवणे बी.ए.एल.एल.बी. यांनी रोहिले बुद्रुक येथील संविधान आर्मी शाखा उद्घाटन प्रसंगी व संविधान तिरंगा रॅली आणि संविधान गौरव सभा प्रसंगी केले. 

मुक्ताराम बागुल यांच्या संविधान आर्मी, संविधान रक्षक सैनिक मुक्ताराम बागुल यांच्या नियुक्ती बद्दल नाशिक जिल्हा कमिटीच्या वतीने संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई काळे, नाशिक जिल्हाध्यक्ष अतुलभाई अडांगळे, स्टुडन्ट संविधान आर्मी जिल्हाप्रमुख सतीशभाई गांगुर्डे , सविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र नेते संतोष अडांगळे व संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र नेते भाई शेख, जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचे सर्वत्र शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले आहे.

संविधान आर्मी की क्या पहचान एक हात मे तिरंगा,एक हात में संविधान हा नारा बुलंद करून आज संविधान धोक्यात आहे. ओबीसी, एससी,एनटी आरक्षण हे धोक्यात आहे. मराठा धनगर, मुस्लिम यांना आरक्षण मिळत नाहीये म्हणून संविधानवादी व आरक्षणवादी शक्ती एकत्र करून चळवळ उभारण्यासाठी महाराष्ट्रात पाच लाख सविधान रक्षक सैनिक निर्माण करण्याचा संविधान आर्मीचा झंझावात व वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता संविधानवादी व संविधान बचाव ची मनुस्मृतिवादी थांबू शकत नाही. कारण ही भीमा भिमस्मृति मनुवाद्यांमध्ये नाही.

संविधान बचाव चळवळ या देशात शक्तिशाली व मजबूत करण्यासाठी संविधान वादी 135 कोटी जनतेला एकत्र करून त्यांचे संघटन निर्माण करण्याचा निर्धार व संकल्प नवनियुक्त नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष व पत्रकार मुक्ताराम भाई बागुल यांनी व्यक्त केला आहे. संविधानाचा विजय असो हा नारा व संविधान ही हमारा ध्येय हे! संविधान आर्मी की क्या पहचान, एक हात मे तिरंगा संविधान, संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वादी विचार डोक्यात ठेवून व त्यांची प्रतिमा एका हातात घेऊन ही संविधान बचाव सर्वांनी शक्तिशाली करू असा निर्धार मुक्तारामभाई बागुल यांनी रोहिले बुद्रुक येथील संविधान तिरंगा रॅली व संविधान गौरव सभा याप्रसंगी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे