आपल खान्देश

पाचोरा कृष्णापुरी परिसरात विविध कामांसंदर्भात पालिका मुख्याधिकारी यांना नागरिकांनी निवेदन दिले. 


पाचोरा कृष्णापुरी परिसरात विविध कामांसंदर्भात व नागरी समस्यासाठी जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ तर्फे पाचोरा नगरपालिका मुख्य प्रशासक देवरे यांना लेखी निवेदन देण्यात आले असून नागरी समस्या बाबत उदासीन पालिका प्रशासन काय ऍक्शन घेते याकडे लक्ष लागून आहे.

पाचोरा शहरातील विविध विकास कामे झाली त्यात महत्त्वाचा म्हणजे पाचोरा शहराला जोडला जाणारा कृष्णापुरी भागातील हिरवा नदी वरचा पूल झाल्यामुळे या भागतील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. परंतु याठिकाणी पूर्वीपासून असलेली एक सार्वजनिक मुतारी रस्त्याच्या कामामुळे तोडण्यात आली असून पुन्हा मात्र ती बांधण्यात आली नाही. तरी पालिकेने सदर शौचालय बांधावे तसेच वाघ डेअरी जवळ नेहमी गटारीचे पाणी साचते त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होऊ शकतो त्याचे नियोजन करावे व भुयारी गटारीचे काम पूर्ण करून पेव्हर ब्लॉक बसवा अश्या तीन समस्यासाठी जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ तर्फे नगरपालिका मुख्य प्रशासक यांना लेखी निवेदन देऊन मुतारी लवकरात लवकर बांधण्यात यावी अशी मागणी केली यावेळी कृष्णापुरी भागातील नागरिक प्रदीप भगवान वाघ, विशाल अरुण सोनवणे, संदिप प्रकाश पाटील, सुदर्शन आत्माराम सोनवणे, अँड अविनाश सोनार, संदीप माणिक पाटील , प्रमोद सुपडु बारी, कपिल विनोद पाटील, संदिप अशोका तांबे, समाधान नामदेव पाटील, नितीन मानिक पाटील, प्रशांत बोरसे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे