कुसुंबा येथे दिपक परदेशी यांचा सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा मोठया दिमाखात संपन्न..
सेवापूर्ती हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अनमोल योग मोठया दिमाखात संपन्न झाला.
दिपक शिवराम परदेशी यांचा सत्कार करतांना जि.प.सदस्य संग्राम पाटील, पं स सदस्य रितेश परदेशी,
_______________________________________
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया @दिलीप जय परदेशी
कुसुंबा (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील धुळे नंदुरबार जिल्हा बँकेतुन सेवानिवृत्त झालेल्या बँक व्यवस्थापक दिपक शिवराम परदेशी आपल्या सेवेतील सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत कशाप्रकारे कार्य केले आणि सेवेतील अनेक अनुभव सांगितले. सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा दरम्यान राजकीय व सामाजिक तसेच ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कुसुंबा येथील सत्कारमूर्तीं दिपक शिवराम परदेशी यांचे औक्षण व सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जिल्हा सहकारी बँकेचे माध्यमातून दीपक परदेशी यांनी विविध पदावर काम करून एक सभासद, ठेवीदारांचा, शेतकऱ्यांचा, सचिवांचा विश्वास संपादन केला, त्या निमित्ताने त्यांनी इमाने इतबारे सर्वांची सेवा केली, प्रेमाची वागणूक दिली. सेवापूर्ती हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अनमोल योग मोठया दिमाखात संपन्न झाला.


सेवापूर्ती अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजभूषण महादू झगा परदेशी हे तर प्रमुख अतिथी म्हणून कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अविनाश शिंदे, जि.प.सदस्य संग्राम पाटील, राष्ट्रवादीचे नेते किरण शिंदे, पं स सदस्य रितेश परदेशी, मनोज चौधरी (तालुका उपनिबंधक,धुळे), डॉ दत्ता परदेशी विकास सोसायटी चेअरमन, किशोर राजाराम शिंदे, नरेंद्र गोटू परदेशी (माजी विरोधी पक्षनेता,धुळे मनपा), बँकेचे माजी सरव्यवस्थापक दत्तात्रय दुसाने, DDCC बँकेचे विभागीय अधिकारी एम.एस.मोरे, बँकेचे वसुली अधिकारी आर .एस.राजपूत, ज्येष्ठ समाजसेवक मोतीलाल धनजी परदेशी, छबीलाल मोतीराम परदेशी, कुसुंबा धनगर समाज अध्यक्ष छबिलाल तुळशीराम परदेशी, गेंदा नागो परदेशी(माजी सरपंच), ज्येष्ठ नागरिक नारायण दगडू शिंदे, नारायण परदेशी सर, राजेंद्र परदेशी (ग्रा.पं.सदस्य), गोविंद नथ्थु गढरी (सेवानिवृत्त PSI), कुणाल किरण शिंदे, जगदीश शंकर रायते(माजी विकास सोसायटी चेअरमन), भगवान गुलचंद भिल(माजी पं.स.सदस्य) रमेश चिंधु परदेशी, राजेश शिवराम परदेशी, संजय शिवराम परदेशी, जगदीश निळकंठ परदेशी, भूषण दिपक परदेशी, प्रितम दिपक परदेशी, मयूर रमेश परदेशी, साहिल राजेश परदेशी, सुनील परदेशी टेलर, संजय झिपरू गढरी, जयवंत देसले, ललित परदेशी, धनराज परदेशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन नंदकुमार शिरुडे सर यांनी केले.




