ब्रेकिंग

नांदगावात मराठी चित्रपट “मी रमाई ” माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त प्रथमच होणार


नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे मराठी चित्रपट ” मी रमाई “हा त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी मंगळवारी आय इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन ” मी रमाई ” मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. नांदगाव शहरात प्रथमच माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुप यांच्या वतीने स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सोनी मराठी मालिकेतील माझ्या नवऱ्याची बायको, सात जन्माची गाठ, मराठी चित्रपट प्रेम वारी, बाबू, मी रमाई च्या अनेक मालिकेचे चित्रपटात ज्यांनी आपला अभिनयाचा ठसा उठवला आहे. अशा प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका उबाळे यांचा मराठी चित्रपट ” मी रमाई ” यांच्या उपस्थितीत दाखविण्यात येणार आहे. 

 माता रमाई यांच्या जीवनावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष , आजी-माजी नगरसेवक, प्राध्यापक, शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य विभागाचे डॉक्टर, पत्रकार बांधव, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आदींना सन्मानाची नदी होऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर कंपाउंड नांदगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने सांगितले जाते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे