आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

अमळनेर तालुक्यातील नीम गावातील ग्रामसेवकाला २५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले

अंमळनेर (झूम मराठी) अमळनेर तालुक्यातील नीम येथील वीट भट्टी चालवण्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील नीम येथील ग्रामसेवकाला (Gram sevak) जळगाव लाचलुचपत विभागाने (acb) रंगेहाथ पकडले आहे.

अमळनेर तालुक्यातील नीम येथे वीट भट्टी चालवण्यासाठी एकाने महसूल विभागाकडे ६ हजार रुपये रॉयल्टी भरली होती. तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला लागेल व त्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यांनी मागितली तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानन्तर २३ रोजी दुपारी डीवायएसपी शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एन एन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

  • @दुरध्वनी क्रं. 0257-2235477
  • मोबा.क्रं. 8766412529
  •  टोल फ्रि क्रं. 1064
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे