आपल खान्देश

पाचोऱ्यात चितेवरील मृत करोना रूग्ण झाला जिवंत!!; अफवाच

पाचोरा live                                दिलीप परदेशी 

पाचोऱ्यात मागील दोन दिवसापासून सोशल मीडियावर सर्वात चर्चेला विषय पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला अशी अफवा पसरवली जात असून ती बातमी खोटी असल्याचे सांगत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही अशी माहिती पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिली आहे.

याबाबत स्मशान भूमी मध्ये मृतदेह पेटवण्यासाठी ज्या इसमाला रीतसर कायद्यानुसार ठेका देण्यात आला आहे. तसेच सुरज चांगरे उर्फ भैरू व ठेकेदार जावेद शेख,विजू भोई व इतर इसमांची विचारपूस केली असता असा कुठलाही प्रकार याठिकाणी झालेला नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच या प्रकारचे वृत्त कोणीही सोशल मीडियावर अथवा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करू नये व कोविड-१९ सारख्या महामारी मध्ये शासनाला सहकार्य करावे असे पाचोरा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे