पाचोऱ्यात गळफास घेऊन विवाहित महिलेची आत्महत्या..
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसिडेन्सी परिसरातील रहिवासी एका 30 वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसिडेन्सी परिसरातील रहिवासी निलिमा अशोक पाटील नामक 30 वर्षीय विवाहितेने घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ हे घर न उघडल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आवाज दिला असता आतून कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आतमध्ये प्रवेश केला असता विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती तातडीने पाचोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून. या विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


