ब्रेकिंग

भडगाव तालुक्यातील वडजी गावातील ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात; काँग्रेस ऍक्शन मोड मध्ये.!

सबंधित ग्रामसेवका वर कारवाई न झाल्यास कॉंग्रेस आंदोलन करणार


भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडजी गावातील ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे या विरोधात कॉंग्रेस ऍक्शन मोड मध्ये येत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भडगाव तालुक्यातील वडजी गावातील २५ /१५ हेड खाली रोकडा फार्म येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सभागृह बांधकाम करण्यात आले आहे या कामासाठी ग्रामसेवक अनिल राठोड यांनी ना हरकत देण्याचा प्रमाणपत्र दिले वास्तविक पाहता हा अधिकार नसताना शाळेला हस्तांतरित करण्यात येत आहे असे मुख्याध्यापक यांच्या नावे आदेश देण्यात आला. हा गैर आदेश असुन ग्रामसेवकानां तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रार करुन देखिल ग्रामसेवकाने मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. तसेच ग्रामसेवक हे अप-डाउन करतात ग्रामपंचायत मध्ये उपस्थितीत राहत नसल्याची तक्रार कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, अल्पसंख्यक अध्यक्ष कमर अली, हारुन पटेल, सरचिटणीस भुषण पाटील, अतुल पाटील प्रकाश सोनवणे आदींनी भडगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. दि. ३० तारखे पर्यंत सबंधित ग्रामसेवका वर कारवाई न झाल्यास कधीही कॉंग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे