आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

नागपूर अधिवेशनात पोलीस पाटीलांचा धडकणार मोर्चा, पाचोरा तालुक्यातील पोलीस पाटील रवाना, कॉंग्रेसचा त्यांना पाठींबा..

तालुक्यातील पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.


पाचोरा (झूम )  नागपूर येथील विधानसभेवर पोलीस पाटीलांचा लाखोंच्या संख्येने होत असलेल्या मोर्चा साठी पाचोऱ्यातील पोलीस पाटील बांधव रवाना झाले पाचोरा तालुका कॉंग्रेसने दिला पाठींबा.

महाराष्ट्रातील पोलीस पाटील बांधव आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज नागपूरात धडकत असुन लाखोंच्या संख्येने पोलीस पाटील बांधव सामिल होत आहे. यात पाचोरा रेल्वे स्थानकावरुन तालुक्यातील पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या मोर्चाला पाठींबा देत कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पोलीस पाटील बांधवांना रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की विधानसभेत आमदारांच्या मानधन पासून सेवानिवृत्ती पेन्शन, चालक, स्विय्य सहाय्यक अशांचे मानधन एकमताने मंजूर करण्यात येते मग पोलीस पाटील यांचे मानधन महागाई च्या दुनियेत तुटपुंज्या स्वरूपाची का? सन १९६७ च्या कालबाह्य कायद्यात तात्काळ बदल होणे क्रमप्राप्त आहे याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करत पोलीस पाटील यांच्या मोर्चा ला पाठींबा दिला आहे .यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा संघटक विनोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम तेली, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, नितीन जमदाडे, एकनाथ कोळी, सह जवळपास ५० हुन अधिक पोलीस पाटील रवाना झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे