देश-विदेशमहाराष्ट्र

केंद्र सरकारचा पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक; आठ यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक

मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केले असल्याचे समोर आले आहे. भारतविरोधात बनावट आणि चुकीचे वृत्त पसरवणाऱ्या चॅनेलला भारत सरकारने ब्लॉक करायला लावले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आठ यूट्यूब चॅनेल ब्लॉक केली आहेत. यामध्ये पाकिस्तानी चॅनेलचादेखील समावेश होता. तसेच, यामध्ये सात भारतीय चॅनेल आणि एक पाकिस्तानी वाहिनी होती.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, बनावट माहिती प्रसार करण्यासाठी या आठ यूट्यूब चॅनेलचा वापर केला जात होता. त्याकरिता तत्काळ ही आठ चॅनेल्स ब्लॉक करण्यात आलेली आहे. IT नियम, २०२१ अंतर्गत सात भारतीय आणि एक पाकिस्तान आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. भारताला बदनाम करणाऱ्या या यूट्यूब चॅनेलला ११४  कोटी लोकांनी पहिले आहेत. तसेच या चॅनेलचे ८५ लाख ७३ हजार सब्सक्राइबर्स होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे