आपल खान्देश

कल्याण – बदलापूर रस्त्यालागत दुकानदारांचे पुनर्वसन करावे

दिलीप परदेशी-झूम मराठी न्यूज डिजिटल मीडिया 

अंबरनाथ पश्चिम येथिल कल्याण – बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरण व कॉक्रीटीकरण करताना ६०० हुन अधिक दुकाने बाधित झालेली होती. बाधित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना नव्याने दुकाने उभारण्यास मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर शासन स्तरावर पाठपुरावा करीत होते. त्याअनुषंगाने गुरुवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरसींगच्या माध्यमातून मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती याबैठकी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार बाधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याकरिता आवश्यक जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.

 याबैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्री.भूषण गगराणी, सहसचिव श्री.संजय बाणाईत, जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. नारकर, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.खानजी धल, व्यापारी श्री.हाजी चौधरी, श्री.अशोक नापडे, श्री.अब्दुल रौफ, श्री.नबी शेख, श्री.रोहन कवळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे