ब्रेकिंग

गुजरात विजयानंतर पंतप्रधान मोदींनी केले जळगावच्या सुपुत्राच्या कौतूक…!

गुजरात राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार बहुमतात आले भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर भाजपाने हा विजय मिळवला असला तरी या विजयाचे शिल्पकार जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावच्या सुपुत्राचे कौतूक केले आहे.

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु असल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी गांधीनगरमधील भाजपा मुख्यालयात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत सी आर पाटील यांचे अभिनंदन व कौतूक केले आहे. याचं कारण म्हणजे मोदींचे निकटवर्तीय म्हणून खासदार सी आर पाटील यांची ओळख आहे. यंदा गुजरातमध्ये भाजपाला अ‍ॅन्टीइंम्कबंसीची भीती सतावत होती. दुसरीकडे आपनेही पूर्ण ताकद लावली होती. यापार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी आर पाटील यांनी सुक्ष्म नियोजन करत भाजपाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.

कोण आहेत सी.आर.पाटील?

गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका पिंप्री अकाराऊत या गावचे रहिवासी आहेत. आजही त्यांचा जळगाव शहारात डी मार्ट ते आरटीओ कार्यालयादरम्यानच्या मार्गावर मोठा बंगला आहे. तेथे ते नियमित येत असतात. जवळपास गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत. पाटील २००९ पासून भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे