तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गो से हायस्कूलची यशस्वी उत्तुंग भरारी…
पाचोरा ( प्रतिनिधी)सतरा वर्षाखालील खो-खो च्या शासकीय क्रीडा स्पर्धेत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल पाचोराच्या विद्यार्थिनींचे उत्तुंग यश आज नगरदेवळा येथे सरदार विद्यालयात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत च्या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय विजेतेपद प्राप्त केले.
विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्हीटी जोशी, मानद सचिव ऍड महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खालील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे. पर्यवेक्षक आर एल पाटील पर्यवेक्षक ए. बी अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व जिल्हास्तरीय सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.


