आपल खान्देशब्रेकिंग

धुळ्यात  खळबळ… पोलीस निरीक्षकाची आत्महत्या 

धुळ्यात  खळबळ… पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असं या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात पोलीस (Police) निरीक्षकाने प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात आत्महत्या केली आहे. प्रवीण कदम असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. प्रवीण कदम यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कदम हे कार्यरत होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन सोहळा २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाची तयारी सध्या मैदानावर सुरु आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत होते. ही संधी साधून काहीतरी कामाचे निमित्त करुन पोलीस निरीक्षक कदम हे राहत असलेल्या ब्लॉकमध्ये आले. दाराची कडी आतून लावून घेत रुमच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.घटना लक्षात येताच खळबळ उडाली. त्यांना तातडीने खाली उतरुन हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते. कदम यांना गायनासह पियानो वाजविण्याची आवड होती. शिवाय ते सर्पमित्रही होते. त्यांचा परिवार नाशिक येथे आहे. ते धुळ्यात एकटे राहत होते. त्यांनी आत्महत्या का आणि कशासाठी केली याचे कारण समजू शकलेले नाही.

पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्त होते. या घटनेने धुळ्यातील (Dhule) पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक कदम यांच्या आतमहत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे