आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा कॉंग्रेस ‘भारतजोडो पदयात्रेत’ बहू संख्येने होणार सामील..

पाचोरा (प्रतिनिधी) भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे या यात्रेत पाचोरा शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाचोरा कॉंग्रेस ने दि. ६ नोव्हेंबर रोजी जम्बो बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील शासकीय विश्रामगृहात दि. ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे सदरच्या बैठकीत प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख आदी उपस्थितीत राहणार आहे. बैठकीत राहुल गांधी यांनी पायी सुरू केलेल्या कन्या कुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातुन असंख्य युवकांसह नागरिक उत्सुक आहेत. ६ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येत आहे यात्रेत जळगाव जिल्ह्य़ातील लोकांचा सहभाग दि. १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेगाव येथील होणाऱ्या राहुल गांधी यांच्या विराट सभेत होणार आहे. या यात्रेत सहभागी कसे व्हायचे यासाठी चर्चा होणार आहे. बैठकीत शहर व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे