आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय
आमदार किशोर पाटील यांनी अनाथ वारकरी संप्रदायातील मुलामुलींची दिवाळी केली गोड..
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथील रामदेव लॉन्स जवळील वारकरी भवन येथील पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी दिवाळी निमित्त अनाथ मुला मुलींची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेत त्या सर्व अनाथ मुला मुलींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन, प्रत्येकास मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
यावेळी वारकरी भवनचे संस्थापक रमेशशेठ मोर, शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल आबा पाटील, शैलेश खंडेलवाल, सुभाष शेठ अग्रवाल, सुजित तिवारी, थेपडे सर , वारकरी भवन चे ह.भ.प. योगेशजी महाराज, ह.भ.प.सुनीताताई व मान्यवर उपस्थित होते.






