पाचोरा शहरात महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज स्मृतीदिन निमित्त अभिवादन..
झूम मराठी | डिजिटल
पाचोरा (झूम मराठी) जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांचा तृतीय स्मृती दिना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला.
जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा तृतीय स्मृती दिन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा करण्यात आला या वेळी शाळेतील विद्यार्थी ऊर्जा धाडीवाल, कनिष्कां जैन, आँचल जैन, विनय धाडीवाल ,सक्षम संचेती, मुदित धाडीवाल या विद्यार्थ्यांनी महाराज साहब यांच्या कार्याबदद्ल माहीती सांगुन नवकार मंत्राचे उच्चारण केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, खजिनदार जगदीश खिलोशिया , स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी संचालक संजय संघवी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता पाटील मॅडम पर्यवेक्षिका सौ विद्या थेपडे मॅडम हे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन सौ.प्रतिभा शिंदे मॅडम यांनी केले. कार्यकमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





