आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

प्रा शिवाजी शिंदे व गुणवंतराव पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर..

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेने निवड केलेल्या दोनही गुणवंत शिक्षकांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे


पाचोरा – “महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र” तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार-2022” जळगाव जिल्ह्यातील दोघांना जाहीर झाला आहे. प्राथमिक विभागातील गुणवंतराव वामनराव पवार व माध्यमिक विभागातील प्रा. शिवाजी भास्कर शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात दिनांक 30 रोजी जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण दशरथ महाजन (चाळीसगाव) व जिल्हा सचिव प्रवीण काकाजी मोरे (चाळीसगाव) यांच्या शिफारशीनुसार प्रदेश कार्यकारिणीने वरील दोघांना हा पुरस्कार जाहीर केला आहे, गुणवंतराव पवार हे गोराडखेडा (ता. पाचोरा) येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर सेवेत आहेत. मागील 36 वर्षात त्यांना दलित साहित्य अकादमी, रोटरी क्लब पाचोरा व चाळीसगाव, समता शिक्षण परिषद, तसेच तालुकास्तर आणि जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. विविध स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

प्राध्यापक शिवाजी शिंदे हे 28 वर्षापासून अध्यापन सेवेत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे ते सेवारत आहेत. राज्य , जिल्हा व तालुका स्तरावर विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. पत्रकार, लेखक, कवी, निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय जनगणना कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. यापूर्वीही त्यांना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा सेवा संघ -संभाजी ब्रिगेड, शिक्षक आमदार अपूर्व हिरे, रोटरी क्लब ऑफ पाचोरा, तसेच रोटरी क्लब चाळीसगाव, समाज प्रबोधन संस्था नाशिक, दर्जी फाउंडेशन, अशा विविध संस्था संघटना तर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. 2018 च्या नगरपालिकेचे स्वच्छता विषयक ब्रँड अँबेसेडर व सतत तीन वर्ष पाचोरा लोकन्यायालयाचे पंचन्यायाधीश म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेने निवड केलेल्या दोनही गुणवंत शिक्षकांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे