आपल खान्देश

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते, उद्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप..

झूम मराठी वृत्त

पाचोरा ता.23: पाचोरा-भडगावचे मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे स्थानिक विकास निधीतुन भडगाव व पाचोरा तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाना 20 लाखाचे साहीत्य वाटप केले जाणार आहे. त्यातील पहील्या टप्प्यात भडगाव तालुक्यात उद्या (ता.24) ला दुपारी 12 वाजता शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

काही दिवसापुर्वी भडगाव व पाचोरा तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाची आमदार किशोर पाटील यांच्या वतीने तज्ञ डाॅक्टराकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना आवश्यक असेलेल साहित्य आमदार निधीतून देण्याचे आमदार किशोर पाटील यांनी दिले होते. त्यानुसार भडगाव तालुक्यातील नोंदणी केलेल्या दिव्यांगाना उद्या (ता.23) शिवसेना कार्यालयात साहीत्याचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणुन माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक प्रतापराव पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, योगेश गंजे, तसेच समाज कल्याण अधिकारी, दिव्यांग अधिकारी गणेशपूरकर, विकास पाटील, आदि उपस्थीत राहणार आहेत. दिव्यांगाना सायकल, कृत्रिम अवयव, कर्णयंत्र आदि साहीत्य देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे