पाचोरा शहरातील चर्मकार समाजाच्या ऐक्याने समाज मंदिराच्या विषयास तात्काळ मंजुरी देण्यात आली
संपादक दिलीप जय परदेशी.
पाचोरा (झूम मराठी) -हनुमान नगर, नागसेन नगर,अक्सा नगर जारगाव तालुका पाचोरा येथील शंभर ते दीडशे घरांचीवस्ती असलेल्या चर्मकार समाज वस्तीसाठीचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भव्य समाज मंदिराचा विषय आज संत शिरोमणी गुरु रविदास बहुउद्देशीय संस्था पाचोरा तालुक्याच्यावतीने स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या समोर मांडण्यात आला. वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदने देऊन सदर विषय प्रसिद्ध झोतात आलेला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे विषयास मंजुरी मिळत नव्हती.
पाचोरा तालुक्यातील चर्मकार समाजाचे ऐक्याने तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडूभाऊ पवार जळगाव, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, मनोहर जोनवाळ, शैलेंद्र पवार, तालुक्याचे अध्यक्ष रामकृष्ण मोची, उपाध्यक्ष अमर वाघ, तालुका सचिव गुरुलाल पवार, शहराध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष किरण गायकवाड, खजिनदार गोपाल मोरे व त्यांचे संपूर्ण कार्यकारिणीने सदर समाज मंदिराचे भव्य निर्माण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच जवाहर हाऊसिंग सोसायटी बाहेरपुरा येथील जुने समाज मंदिराचे सुद्धा जीर्णोद्धार करून तेथे सुद्धा शिषोभीकरण करण्याचे विषयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार किशोर पाटील यांनी त्वरित पाठपुरावा करून मंजुरी देण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले.
यावेळी अनेक राजकीय सामाजिक विषयांवर आमदार महोदय यांनी समर्पक चर्चा केली. व जुने जाणते कार्यकर्त्यांशी हितगुज करून मदतीचे आश्वासन देखील दिले. आप्पासाहेब पोलीस खात्यात नोकरीस असताना माजी पोलीस निरीक्षक उत्तमजी सोनवणे यांनी देखील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांचे सुद्धा पूर्वीपासून चर्मकार समाजावर प्रेम होते. व त्यावेळेस सुद्धा जवाहर हाऊसिंग सोसायटी बाहेरपुरा येथे स्वर्गीय साहेबराव सखाराम निकम यांना नगरसेवक म्हणून निवडून आणले. व पाच लाखाचे भव्य समाज मंदिर सभागृह बांधून दिले होते. तथा त्यांचे स्वप्न होते की जारगाव मध्ये सुद्धा चर्मकार समाजाची हक्काची भव्य वास्तू उभी राहावी. ते स्वप्न माननीय किशोर आप्पा पाटील यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. व अश्विन शुक्ल पक्ष म्हणजेच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर भव्य स्वरूपात भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाचोरा तालुक्यातील चर्मकार समाजाचे ज्येष्ठश्रेष्ठ मार्गदर्शक श्री रामलाल गांगे, वसंत वाघ गुरुजी, प्रकाशजी मीमरोठ, आदर्श ग्रामसेवक संतोषजी शिवनेकर यांनी समाजाला एकजूट राहून आर्थिक सामाजिक शैक्षणिक व बौद्धिक उन्नती करण्यासाठीचे मार्गदर्शन केले याप्रसंगी गंगाराम तेली संदीप गाडेकर मुख्याध्यापक राजू सावंत सर, दिलीपजी अहिरे, नितीन तायडे, अनिल पवार,संजय शेवाळे, नंदलाल आगारे, भगवान पवार आकाश पवार, कुंदन देसाई, नितीन पवार, गोवर्धन जाधव, रमेश पवार, मोतीलाल पवार, हिरालाल जाधव, भारत पवार, रोहित गायकवाड, सागर जाधव, हिरालाल शेवाळे गणेश जाधव पाचोरा शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.




