पंजाबमेल व विदर्भ एक्सप्रेसला पाचोऱ्यात थांबा मिळण्यासाठी, रेल्वे प्रवासी कृती समिती तीव्र आंदोलन छेडणार!
कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेल्या रेल्वेच्या वेळापत्रकामुळे पाचोरा शहर व तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
पाचोरा (अनिल येवले)पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसला पाचोरा थांबा मिळण्यासाठी आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर सुरू करण्यासाठी पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहीती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेल्या रेल्वेच्या वेळापत्रकामुळे पाचोरा शहर व तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.व्यापारी, विद्यार्थी व नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन “पाचोरा रेल्वे प्रवासीकृती समितीने” आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

एक यशस्वी आंदोलनाच्या लढ्यानंतर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस ला पाचोरा येथे थांबा मिळवण्यासाठी दुसऱ्या आंदोलनाच्या लढा यशस्वी होण्यासाठी रेल्वे बचाव कृती समिती आंदोलनाच्या दिशेने
पाचोरा कृती समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती निर्णय घेण्यात आला की, सांयकाळी ६ वाजे नंतर पाचोरा स्टेशनहुन मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे नाही त्यामुळे पंजाब मेल आणि विदर्भ एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळायलाच पाहीजे. तसेच कोरोना महामारी मुळे बंद झालेली भुसावळ – मुंबई पॅसेंजर (क्रं. ११३५४ – ११३५३) आज तागायत बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातुन आर्थिक झळ बसते. या दोन्ही मागण्यांचा रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाने गंभीरपणे विचार करून सदरच्या मागण्या त्वरीत मंजुर करून लोकभावनेचा आदर करावा. त्याचप्रमाणे पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गैरसोयींची यादी ही दिवसेंदिवस वाढत आहे.
प्लॅटफॉर्मची लांबी वाढली परंतु वाढीव प्लॅटफॉर्मवर शेड बनलेले नाही. कोच इंडीकेटरची व्यवस्था नसल्याने गाडी अल्यानंतर प्रवाशांची प्रचंड धावपळ होते. या बाबी देखील गंभीर समस्यांच्या यादीतच येतात याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. या सर्व मागण्यांचा गंभीर पणे विचार करून उपरोक्त मागण्यांची प्रशासनाने पूर्तता करून प्रवाश्यांची सोय करावी. अन्यथा इतर सर्व प्रवासी संघटनांना सोबत घेऊन “पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समिती” तीव्र आदोलन छेडेल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी कृती समितीच्या बैठकीत दिला. सदर बैटकीस विलास जोशी, अॅड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, प्रा. गणेश पाटील, संजय जडे, पप्पु राजपुत, रणजीत पाटील सर, विकास वाघ, मंगेश पाटील, मिलिंद सोनवणे, कांतीलाल जैन, प्रभुराम पाटील, प्रा. मनिष बाविस्कर, निलेश कोटेजा, शाहबाज बागवान, अॅड. अण्णा भोईटे, एकनाथ संदनशिव, जगदिश शेठ पटवारी, रमेश शामनाणी,अनिल येवले उपस्थितीत होते. सदरचे बैठकिनंतर मागण्यांचे निवेदन तयार करून निवेदन संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. यात खा. उन्मेश पाटील, रेल्वे मंत्रालय, नवी दिल्ली, जनरल मॅनेजर मुंबई, डी. आर. एम. भुसावळ व स्टेशन मास्टर पाचोरा यांना देण्यात आले आहे.
जाहीरती



