महाराष्ट्र

एसटी कर्मचा-यांच्या संपात फुट, अजय गुजर प्रणित संघटनेचा संप मागे

एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू होते. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारच्यावतीने पहिल्या टप्प्यात मान्य केल्या होत्या. मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावरून कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला होता. याबाबत सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका झाल्या.

अखेर कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली, त्यांच्यावरील फोजदारी कारवाई मागे घेणे अशा विविध मुद्यांवर काही अटी व शर्तींच्या आधीन राहून हा संप मागे घेत असल्याची माहिती अजय गुजर यांनी दिली. मात्र इतर एसटी संघटनांकडून संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अजय गुजर प्रणित संघटनेने संपातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुजर यांनी त्यांच्या संघटनेतील कर्मचा-यांना २२ डिसेंबर पर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आझाद मैदानात संप करत असलेले कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी अजय गुजर हे विकले गेले असल्याचा आरोप केला आहे. आमचा संपाचे कुणीही नेतृत्व करत नसून आम्ही एसटीच्या विलीनीकरणावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली. अजय गुजर यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

कामगार संपावर ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजय गुजर यांना पैसे देऊन फोडण्यात आले आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी विलिनीकरणापर्यंत संपावर ठाम राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे संप सुरुच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे