पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
झूम मराठी
पाचोरा शहरातील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश मेडीयम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षकांना पुष्प व शिक्षकांबद्दल संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले.सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून आनंद घेतला. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी विद्यार्थी शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करतात. तसेच आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.




