ब्रेकिंग

जळगाव – विज बिल दुरुस्तीसाठी दहा हजाराची लाच मागणी!

जळगाव (वृत्तसेवा) विज बिलात दुरुस्ती करुन देण्यासाठी अभियंत्याच्या नावाने दहा हजाराची लाच मागणा-या खासगी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुधाकर सासनीक (रा. श्रद्धा कॉलनी महाबळ जळगाव) असे लाचेची मागणी करणा-या खासगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदाराचा एमआयडीसी परिसरात कार दुरुस्तीचा व्यवसाय आहे. या जागेवर असलेल्या व्यावसायिक विज मिटरचा सेक्शन लोड 26KW असतांना येणाऱ्या विज बिलामध्ये लोड 2KW असा नमुद होता. विज मिटर असलेल्या घटनास्थळाला विज मंडळाच्या व्हिजीलन्स पथकाने तपासणी केल्यापासून तक्रारदारास वाढीव रकमेचे बिल येत होते. या बिलामधे सेक्शन लोड 26 KW ऐवजी लोड 18KW अशी दुरुस्ती करायची होती. त्या दुरुस्तीसाठी खासगी इसमाने तक्रारदारास ऑनलाईन अर्ज भरुन देत अभियंता पाचंगे यांच्याकडून दुरुस्ती करुन देतो असे सांगून दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. सदर लाचेची मागणी 22 ऑगस्ट 2022 रोजी करुन ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासगी इसम अनिल सुधाकर सासनिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे विषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध रहावे, सतर्क रहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा आमच्या वेब साईटचा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन या माध्यमातून आपणास करण्यात येत आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे