डोंगर पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या धनगर बांधवांची डॉ. विकास महात्मे यांनी घेतली भेट.
- संजय परदेशी
डोंगर दर्यात राहुन ऊन,वारा,पाऊस अंगावर घेऊन आपल्या मेंढपाळ व्यवसायात स्वतःला झोकून देणार्या धनगर समाज बांधवांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष, मा.खासदार डॉ. विकासजी महात्मे यांनी काल सायंकाळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला डोंगर पायथ्याशी असलेल्या मराठवाडा आणि खान्देशच्या टोकावर वसलेल्या मोहळाई, ता.सोयगांव आणि जळगांव जिल्हयाच्या शेवटच्या टोकाला धनगर बहुल असलेल्या बदरखे गावाला मा.खासदार डॉ विकासजी महात्मे यांनी भेट देऊन समाज बांधवांच्या विविध अडीअडचणी जाणून घेतल्या.
डॉ. विकास महात्मे यांनी दोन्ही गावातील महिलांसह जेष्ठ समाज बांधवासह अबालवृध्दांशी तेथील बोली भाषा, राहणीमान, व्यवसाय, चालीरीती बाबतीत माहीती जानुन घेतली. यावेळी डॉ. महात्मे यांच्या सोबत संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, शितलताई चिंचोले, धुळे पंचायत समितीचे मा. सभापती प्रा.विजय पाटील, सचिन जायभाये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
समाज बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मोहळाई चे मा.सरपंच राजेंद्र परदेशी, भिमराव गढरी, बाबलाल गढरी, दयाराम रोकडे, तर बदरखे येथे राजेंद्र रामदास, गणपत डोंगर,आप्पा पाटील ई.समज बाधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



