आदित्य ठाकरे यांचा झंझावाती दौरा पाचोरा, भडगाव तालुक्यात वादळी ठरणार..!
झूम मराठी
पाचोरा : माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शनिवारी (ता. 20) पाचोरा येथे निष्ठा संवाद यात्रेनिमित्त येत असून, त्यांच्या खानदेश दौऱ्याचा श्रीगणेशा पाचोरा येथूनच होणार आहे. या साठीची पत्रकार परिषद आज वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
पाचोरा शहरातील शिवतीर्थ हे शिवसेना मध्यवर्धी कार्यालय माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती व रंगरंगोटी केली. त्यांनी आज असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली.

शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शक्तीपर्दर्शन देखील केले. मात्र त्यांना भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून थेट घरातूनच आव्हान मिळाले आहे. वैशाली सूर्यवंशी यांना कार्यकर्ते तसेच जनतेकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्यावर काय टीका होणार याची चर्चा रंगत आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खानदेश संवाद यात्रेचा श्रीगणेशा पाचोरा येथूनच होणार असल्याने हा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यासाठी गावनिहाय बैठका, पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांचे संघटन, बॅनर, झेंडे, सभा यासाठीचे नियोजन करण्यात आले. वैशाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करून आदित्य ठाकरे यांचा दौरा सर्वार्थाने यशस्वी करण्याचा निर्धार केला.
वैशालीताई सुर्यवंशी यांच्या या निर्णयामुळे पाचोरा, भडगाव मतदारसंघात ठाकरे साहेबांची शिवसेना व शिंदे यांची स्वयंघोषित शिवसेनेत कमालीचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार असल्याची जोरदार चर्चा पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातून ऐकावयास येत असून या शिव संवाद दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत व वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पाचोरा नगरीत संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे हे निर्मल सिडस येथे भेट देऊन भडगावला नियोजित कार्यक्रमात हजेरी लाऊन नंतर पुढील आयोजित कार्यक्रमाला रवाना होणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा झंझावाती दौरा पाचोरा, भडगाव तालुक्यात वादळी ठरणार असून शिवसेनेची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्राचे जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेशचंद्रजी बाफणा, उपजिल्हा प्रमुख अँड अभय दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. उध्दवभाऊ मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


